Sunday, 9 February 2014

मोबाईल मोटर स्टार्टर

मोबाईल मोटर स्टार्टर हा तंत्रज्ञानाचा एक अविष्कार आहे असे म्हणायला काही हरकत नाही. या स्टार्टरमुळे शेतकऱ्यांची कामे अधिक गतिशील होऊ लागली आहेत. कारण कुठेही असलेला शेतकरी आपल्या मोबाईलच्या साह्याने एका कॉलद्वारे आपल्या शेतातील पाण्याचा पंप चालू करू शकतो. पंप चालू करण्यासाठी त्याला दूरवर असलेल्या रानात जाऊन मोटार चालू करण्याची गरज उरलेली नाही. आजपर्यंत शेतकरी पंप चालू करण्यासाठी शेतात रास्त्री-अपरात्री दूरवर पायी जात होता, त्यात त्याचा खूप वेळ खर्च होत होतात्याचप्रमाणे  पावसाळ्याच्या दिवसांत पंप चालू करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती त्यापासून शेतकऱ्याला आता सुटका मिळणार आहे. मोबाईल स्टार्टरमुले इंधनाचीही बचत होऊ लागली आहे कारण दूरवरच पाण्याचा पंप चालू करण्यासाठी त्याला गाडीवर जावे लागत असल्याने पेट्रोल, डिझेलचाही खर्च येत होता  पण हा खर्च आता शेतकरी वाचवू शकतोसर्वात महत्वाचे म्हणजे घरातील कोणतीही व्यक्ती मोबाईलचा माध्यमातून सहज शेतातील पाण्याचा पंप चालू करू शकते. एकूणच मोबाइल स्टार्टर हे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी आहे. आज या स्तर्तारचा वापर भारतात काही शेतकरीच करतांना दिसतात . जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोबाईल स्टार्टरचा वापर करणे गरजेचे आहे.


मोबाइल स्टार्टर म्हणजे नेमक काय?
 

मोबाइल स्टार्टर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे , जे शेतातील मोटर स्टार्टरला  मोबाइल द्वारे जोडलेले असते . जेव्हा मोबाईल वरून कॉल केला जातो तेव्हा स्टार्टर ऑन होऊन पंप चालू होतो.


 मोबाईल मोटर स्टार्टरची वैशिष्टे :
·हे स्टार्टर शेतात बसविणे अतिशय सोपे आहे.
·पर्यावरणाच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही कार्यक्षम आहे.आणि त्याच दृष्टीकोनातून त्याचे डिझाईन केले गेले आहे.
·हे स्टार्टर सिंगल-फेज , तसेच थ्री-फेज अशा दोन्ही प्रकारच्या मोटारसाठी उपयोगी आहे.
·स्टार्टर ओटो मोडवर ठेवल्यास विजेचा प्रवाह खंडित होऊन पुन्हा लाईट आल्याबरोबर मोटार लगेच चालू होते.
·डेली टायमर मोड फंक्शनचा वापर केल्यास मोटर स्टार्टर दररोज सेट केलेल्या वेळेवर ऑन होऊन पंप चालू होतो
· स्टार्टर टायमर मोडला दिवसात ३० मिनिटांपासून २३. तासांपर्यंतच्या टाईम रेंज मध्ये चालू-बंद करू शकतो.



 शेती क्षेत्रात झालेला हा क्रांतिकारी शोधामुळे भारताची तुलना ईझ्राइल सारख्या शेतीत अव्वल स्थानावर असलेल्या देशाशी नक्कीच होईलया प्रकारचे आधुनिक आणि नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपुढे येत राहिल्यास भारतातील शेतकरी लवकरच आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनेल. माहिती तंत्रज्ञानाची जोड नेहनीचा शेतकऱ्यांना फायद्याची ठरलेली दिसून येते

1 comment:

  1. Microtouch Solo Titanium | Tiara Arts
    Tienen Sotama · Salsa & titanium ring Marinades · Salsa titanium (iv) oxide & Marinades · Salsa & Marinades · Salsa & Marinades · Salsa & Marinades. $8.99. Add to cart. 1. Tienen Sotama · Salsa  Rating: titanium camping cookware 4.8 · ‎11 titanium men\'s wedding band votes · ‎$8.99 · man titanium bracelet ‎In stock

    ReplyDelete