बिघडलेल्या वातावरणामुळे पिकांसाठी पोषक असे अनुकूल परिस्थिती सध्या नाही. कुठलेही पिक सहज पिकविणे शक्य नाही . अशा वेळी शेडनेट तंत्राद्यान महत्वाचे आणि शेतकऱ्यांसाठी पूरक ठरत आहे. शेडनेटमुळे पिकासाठी पोषक असे वातावरण निर्माण होत असल्याने
पिकाची वाढ चांगली आणि निरोग होते. तसेच रोगावरही नियंत्रण ठेवण्यास मदत होऊन शेतमालाचा दर्जा उंचावतो. मालाचा दर्जा चांगला असल्यामुळे बाजारपेठेत अशा मालाला चांगला भाव मिळतो आणि वार्षिक उत्पन्नात वाढ होते. एकच पिक वर्षभर चालू राहिल्यामुळे एकूण वार्षिक उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते.
प्रत्येक शेतकरी आर्थिक स्थिती अशी नसते कि ग्रीनहाऊस उभारू शकतो. कारण ग्रीन हाउस उभारणीसाठी खर्च अधिक असल्याने गरीब शेतकरी ते बनवू शकत नाही अशा वेळी कमी खर्चात शेडनेट उभे करून जास्तीत जास्त उत्पन्न घेणे शक्य होऊ लागले आहे.
शेडनेत उभारणी साठी लागणारे साहित्य
शेडनेट उभारणीसाठी प्रामुख्याने ४ प्रकारच्या नेटचा वापर केला जातो. पांढऱ्या कलरची जाळी, तांबडा , हिरवा आणि काळ्या रंगामध्ये शेडनेट उपलब्ध असून पिकांच्या गरजेनुसार त्या रंगाची जाळी वापरायला गरजेचे ठरते. पांढऱ्या रंगाच्या नेट मुळे ५०% सूर्यकिरणांची तीव्रता कमी होते . त्याचप्रमाणे अनुक्रमे हिरवा रंग ३०%, काळा रंग ७५%, तांबडा रंग ९०% सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करतो. हे सर्व प्रकारचे नेट ६.५ मीटर ल्म्बिपर्यंत रुंद आणि १०० मीटरपर्यंत असते. शेडनेत उभाराणीसाठी १० ते १५ फुट लोखंडी पोलांचा वापर केला जातो.तसेच ६ गेज तार वापरली जाते.

शेडनेत तंत्राद्यानामध्ये सिंचनासाठी ईनलाईन ड्रीपचा वापर केला जातो त्यामुळे कमीत कमी पाणी असेल तरीही पिकला ते सारखे मिळते. याच ड्रीप द्वारे पिकांना लागणारी खाते पाण्यात विरघळून पिकला सोडली जातात. त्यामुळे मालाची गुणवत्ता टिकून राहते.
शेडनेटचे वापर क्षेत्र
शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने बागायती शेती शेतीसाठी उपयुक्त आहे त्याच प्रमाणे फुलांच्या शेतीसाठी, टी- क्लोन नर्सरी , द्राक्ष सावली सुखविण्यासाठी आणि वनस्पती बियाणांच्या नर्सरी साठी मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे.
शेडनेट तंराज्ञानाचा वापर प्रथम ईझ्राईल या देशात करण्यात आला होता .मात्र आता भारतातही शेडनेट तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग शेतकरी करताना दिसत आहेत.
mala shednet loan milel kay
ReplyDelete