Friday 14 February 2014

विद्युत प्रभारी फवारणी यंत्र


विद्युत प्रभारी फवारणी यंत्र कृषी क्षेत्रातीत यांत्रिक शोध असून या यंत्रामुळे शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करण्याचे दिवस आता राहिलेले नाही. त्यामुळे आधुनिक शेती केल्याशिवाय पर्याय नसल्याने विद्युत प्रभारी फवारणी यंत्र हे शेतकऱ्यासाठी वरदानच ठरले आहे . आज शेतीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. द्राक्ष, संत्री, डाळिंब यासारख्या पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज पडते परंतु शहरात त्यांना  जास्त मजुरी मिळत असल्यामुळे शेतीकामासाठी येणे टाळतात. किंवा द्राक्ष घडांची बुडवणी करण्यासाठी १० मजुरांना एकरी एक दिवस असा वेळ लागतोच  परंतु कामाची गुणवत्ताही चांगली मिळत नाही.  त्यामुळे शेती आता यांत्रिक पद्धतीने करणे काळाची गरज आहे. साध्या फवारणी यंत्रामुळे पिकांवर किटकनशके, बुरशीनाशक, तसेच  तणनाशक  फवारणीसाठी एकरी ५०० लिटर रसायन मिश्रित पाण्याचा वापर करावा लागत होता. त्यात जवळपास ९०% रसायने वाया जात होत. जमीनीत रसायने गेल्यामुळे त्याचा परिणाम थेट जमिनीच्या सुपिकतेवर होऊन जमीन नापीक होण्याची भितीही निर्माण होते.. तसेच फवारणीसाठी वेळही अधिक लागत असे परंतु आता विद्युत प्रभारी फवारणी  तंत्रामुळे आता फक्त ६० लिटर द्रावणामधेच  एक एकर पिकावर  सारख्या प्रमाणात  उत्तम  प्रकारे औषधांची फवारणी करणे शक्य झाले आहे.
विद्युत प्रभार फवारणी यंत्राचे उपयोग
हे फवारणी यंत्र विद्युत प्रभार या तत्वावर काम करत असल्या कारणाने  साध्या फवारणी यंत्रातून निघणाऱ्या पाण्याच्या कणापेक्षा ९०० पट लहान सूक्ष्म अणु निघतात त्यामुळे संपूर्ण पिकावर सारख्या प्रमाणात रसायनांची फवारणी होऊन चांगले परिणाम मिळतात. त्यामुळे शेतमालाची गुणवत्ता सुधारून बाजारात अशा मालाला योग्य भाव मिळतो. तसेच वादळी हवा असली तरी अशा वेळी गुरुत्व आकर्षणाच्या विरुद्ध दिशेने देखील फवारणी करू शकतो. या यंत्राचे विद्युत प्रभार क्षेत्र जारत असल्याने  कमी वेळेत जास्त शेतीक्षेत्रावर फवारणी करण्यास मदत होते. या यंत्राचा उपयोग कोणत्याही पिकावर औषध फवारणी साठी केला जाऊ शकतो. कमी रासायानांत जास्त क्षेत्र फवारले गेल्याने औषधांची बचत होऊन काही  रसायनासाठी कमी खर्च येतो. विद्युत प्रभारी यंत्र ट्रकटर च्या सोबत जोडून सहजरीत्या कोणतीही व्यक्ती हाताळू शकते . हे यंत्र काही ठिकाणी वापरत असताना विशेष काळजी घेणे महत्वाचे ठरते. कारण या यंत्राचा फवारणी क्षेत्राची कव्हरेज रेंज जास्त असल्यामुळे शेजारील शेतावरही फवारलेल्या औषधाचा प्रभाव पडू शकतो अशा वेळी काळजीपूर्वक हाताळणी गरजेची ठरते.
 सर्वात  अगोदर जपान देशाने या तंत्रज्ञानाचा उपयोग केला. त्यानंतर भारतानेही हे तंत्रज्ञान आत्मसात करून स्वदेशी प्रभारी फवारणी यंत्र विकसित केले. २००९ नंतर ही टेक्नोलॉजी भारतातील शेतकऱ्यांसाठी खुली झाली. आणि आज या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल दिसून आला आहे. या यंत्राचे एकाहून अधिक मॉडेल आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्र दिवसेंदिवस आधुनिकतेकडे पाऊल टाकत आहे.
     

No comments:

Post a Comment